मुंबईकर
पावसाने दिला तडाखा मुंबईला।
संकटाचा सामना मुंबईकरांनी धीराने केला।।
मराठी गुजराती भैया मुस्लिम झाले होते एकत्।र
धावत होते मदतीला एकसारखे मात्र।।
जात धर्म प्रांत सर्व विसरले।
एक मुंबईकर एवढेच लक्षात ठेवले।।
मंदिर मशिद आश्रम होते सर्वासाठी।
खाणे राहण्याची व्यवस्था करत होते एकमेकांसाठी।।
गरीब श्रीमंत हा भेदच नव्हता ।
माणूसकीचा ठेवा सर्वांमध्ये होता।।
एका पावसाने मिटवली होती दरी।
एका दिवसासाठी झाली होती एक मुंबईनगरी।।
सलाम करतो पाऊस राजा।
असाच अधीमधी येत जा।।
प्रा. दगा देवरे
रुपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment