गणित शिक्षक
गणिताचे शिक्षक समजतात स्वताला भारी।
कारण शिकवतांना करतात चांगली तयारी।।
बेरीज वजाबाकी गुणाकार अन कंसाकडे द्यावे लागते लक्ष।
हे सर्व करताना असावे लागते कायम दक्ष।।
गणित शिकवणे वेड्या गबाळ्याचे काम नाही।
त्यात शिरल्यावर वेळेचं भानच राहत नाही।।
अडाणी माणसालाही घ्यावा लागतो गणिताचा आधार।
म्हणून गणिताने केले सर्वांवर उपकार।।
सकाळ पासून रात्रीपर्यंत पर्याय नाही गणिताशिवाय।
म्हणून सांगतो जीवनात गणिताशिवाय आहे काय।।
गणित म्हटले की भल्याभल्यांना फुटतो घाम।
त्याच्या विचाराने विसरतात आपले काम।।
गणित विषय आहे सर्व विषयांचा मालक।
अन तोच तर आहे सर्वांचा चालक।।
गणित म्हणजे गणित असते।
जमल तर सोपे नाहीतर फार अवघड असते।।
गणितामुळे शिक्षक वाटतात गंभीर।
म्हणून तर त्यांना म्हणतात रणवीर।।
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment