गणपती बाप्पा
गणपती आले गणपती आले
सर्वांची सुरू झाली धावपळ।
कुणी जातो गावाला तर कुणी राहतो घरी
एकूणच सर्वजण करता आहेत पळापळ।।
गणपती म्हणजे बुध्दिची देवता
म्हणून चांगली बुध्दि मिळो सर्वांना।
करावी गणरायाची मनोभावे पूजा
आशिर्वाद देईल लहान थोरांना।।
नका वाजवू वात्रट अश्लिल गाणे
नको नटनट्यांचा तो सिनेमातला नाच।
रूसेल नाहीतर ब्रम्हांडाचा नायक
जाईल तो आशिर्वाद न देताच।।
नको ते मोठमोठे ढोलताशे
होईल त्याला त्रास आवाजाचा।
मग गार्हाणे सांगणार तो मातेला
शिवजी घेणार समाचार तुमचा।।
करू गणरायाला सर्वजण प्रार्थना
पडू दे पाऊस सर्वीकडे चांगला।
होऊ दे शेती हिरवी हिरवीगार
मग आनंद होईल आमच्या बळीराजाला।।
ये देवा सर्व सुखसमृध्दी घेवून
आम्ही करू तुझी मनोभावे सेवा।
काही चुकत असेल तर माफ कर
तुझ्या शिवाय कोण देईल आम्हाला मेवा।।
आम्ही वाहू तुला दुर्वांची जोडी
भरपूर देवू खायाला मोदक।
सर्व संकटे आमच्या वरचे दूर कर
आमच्या डोक्यावर ठेव तुझा वरद हस्तक।।
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment