प्रशिक्षण
प्रशिक्षणाच्या देतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा।
आमचे experts मार्गदर्शनाने पूर्ण करतील तुमच्या इच्छा।।
आपआपल्या काॅलेजचे प्रतिनिधी आहेत तुम्ही।
तुमच्या सर्व शंका दूर करणार आम्ही।।
नका बाळगू मनात कोणतीही भीती।
गणिताजवळ मागा पूर्ण शरणांगती।।
प्रशिक्षण म्हणजे टाईमपास नसते।
ज्ञानात भर पाडणारी ती एक संधी असते।।
गणितामुळे असते आपली मान कायम ताठ।
नव्या पॅटर्नमुळे घ्यावी लागेल कठिण प्रश्नांची गाठ।।
होणार विद्यार्थ्यांची नव्या पॅटर्नमुळे चाळणी।
म्हणून त्यांनी करावी गणिताची सारखी उजळणी।।
नव्या पॅटर्नमुळे शिक्षकांची लागेल खरी कसोटी।
घाबरून नका जाऊ वापरा तुमची हातोटी।।
नाॅलेज अंडरस्टॅडिंग अंप्लिकेशन स्किल हे शब्द पडतील कायम कानावर।
पण शिक्षक नाही सोडणार विद्यार्थ्यांना वार्यावर।।
blueprint मुळे पेपर होईल सोपा काढणे।
आज आमचे तुम्हाला हेच तर सांगणे।।
नव्या पॅटर्नमुळे हुशार विद्यार्थी दिसतील।
अभ्यांस न करणार्यांच्या डोळ्यांपुढे काजवे चमकतील।।
ह्या पॅटर्नमुळे स्टेट बोर्डला सलाम करावा।
हुशार विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांचा मार्ग धरावा।।
हुशार विद्यार्थ्यांना आहे बरेच काम।
आळशी विद्यार्थ्यांनी डोक्याला लावावा बाम।।
नव्या पॅटर्नमुळे हुशार विद्यार्थ्यांना मिळेल खरा न्याय।
अभ्यास न करणारे म्हणतील,फुटकं आमच नशिब , दुसरं काय।।
देवाकडे करतो मी मनापासून प्रार्थना।
येथेचं होऊ दे शंकाचे निरसण,अशी करतो मनोकामना।।
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
7738601925
Comments
Post a Comment