Skip to main content

अचानक

अकस्मात किंवा अचानक

अकस्मात अशा घटना प्रत्येकाच्या जीवनात घडत असतात कधी सुखाच्या तर कधी दु:खाच्या असतात .त्या घटनेने माणूस कधी आनंदी होतो तर कधी दु:खी होतो .अकस्मात कधीही कुणाबरोबरही केव्हाही घडू शकते.कधी अकस्मात कुणाला अशी नोकरी मिळते की त्याने तसा विचारही केलेला नसतो मग अचानक अस स्थळ चालून येते की त्याचा कायापालट होतो व जीवनाला वेगळी दिशा मिळते आणि जीवन प्रगतीपथावर धावू लागते .का होतो व काय झालो असं वाटायला लागते.काहिवेळा सर्व सुरळीत चालू असते अचानक गाडीला अपघात होतो व शरीराला दुखापत होते व चालूही शकत नाही कायमचेचं.कुणीतरी अपघातात दगावते व सुखाचा वाटणारा संसार दु:खाचा वाटू लागतो.काहीवेळा पत्नी व पतीचे पटत नाही तेव्हा ते अलग होतात त्याचा परिणाम मुलांवर होतो व अचानक समोर येते.काहीवेळा घरातल्या व्यक्तीला हार्टअॅटक पॅरालेसिस येतो व तेही अचानक ध्यानीमनी नसताना तेव्हा पूर्ण घरचं आजारी पडते.काहीवेळा अचानक घरात किंवा बाहेर पडण्याचे निमित्त होते व माणूस दगावतो .काहीवेळा अचानक आपल्या तोंडातून एखादा शब्द निघतो समोरचा व्यक्ती त्याचे रामायण करतो व अचानक त्या दिवसापासून दूर जातो.अचानक एखाद्याला प्रमोशन मिळते तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नाही.अचानक कांद्याचा भाव चढतो किंवा खाली येतो तेव्हा शेतकर्‍यांवर त्याचा परिणाम होतो.अचानक पैशांची गरज लागते किंवा कुठूनतरी पैसे मिळतात तेव्हा ह्या अचानकपणे झालेल्या गोष्टी मुळे जीवन क्षणार्धात बदलते.अचानक पाऊस जोरात पडतो .एकतर जीवदान तरी देतो नाहीतर बरबाद करून सोडतो.अचानक साथिचे रोग येतात.अचानक लांब प्रवासाला गेलेलो असतो व गाडी बंद पडते मग काय धावपळ होते हे सांगायलाच नको.अचानक डोकं माणसाचं  सटकतं व नको ते रागाच्या भरात होऊन बसतं
     अशा अचानक झालेल्या घटनांमुळे माणसाचं जीवन ढवळून निघते .तुमच्या जीवनातही अशा अचानक घटना घडल्या असतीलच मग सावरायला जमलं का ?नसेल तर बघा कसं सावरायला जमतं.

प्रा. दगा देवरे
रुपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...