कृतघ्नता
जगात अनेक लोक असे आहेत की तुम्ही त्यांच्यासाठी कितीही केले तरी वेळ आल्यावर आपला कृतघ्नपणा दाखवून देणारच .काम होइपर्यंत असे बोलणार की आपल्याला असे वाटणार की किती आपुलकी आहे पण एकदा काम झाले की साधी ओळखही दाखवायला तयार नसतात.काहीना पैशांची गरज असते तेव्हा तुमची तारिफ करून ते कधीच थकणार नाहीत पण एकदा पैसे मिळाले की मग तुम्ही कोण? परत करताना एकतर संबंध खराब होणार नाहीतर ते पैसे कधीच नाही मिळणार .कृतघ्नपणा तंतोतंत अशा केसमध्ये लागू पडतो.काहीवेळा कुणाला सल्ला घ्यायचा असतो तेव्हा सल्ला घेईपर्यंत एकदम गोड गोड बोलणार पण एकदा सल्ला घेतला मग काय संबंध?एखादा अडचणित असला तर सर्व प्रकारची काहीजण मदत करतात पण त्यानंतर सर्व विसरतात .काहीवेळा उलटे होते एखाद्याने अडचणीत मदत केली तर काहीजण जाणीव ठेवतात व त्यालाही मदत करतात पण एका परतफेडीने त्याचे समाधान होत नाही .मग वेळोवेळी बोलून दाखविणार मी मदत केली म्हणूनच तू पुढे गेला पण त्या मदतीची परतफेड कैकपटीने त्याने केलेली असते पण तरीही समोरचा आनंदी नसतो अशा वेळेस वाटते की उगीचच त्याच्याकडून मदत घेतली.असे का होते माहीत नाही.मला वाटते मदत केली असेल तर परतीची अपेक्षाच करू नये नाहितर दु:ख हाती पडेल.सर्वाच्या नात्यामध्ये काही ठिकाणी अबोलपणा आला आहे .कुणी आईवडिलांशी बोलत नसतील कुणी भाऊ भाऊ बोलत नसतील कुणी बहिणि बहिणी बोलत नसतील कुणी भाऊ बहिण बोलत नसतील कुणी काका पुतणे बोलत नसतील कुणी चुलतभाऊ बोलत नसतील कुणी आईबाप मुलांशी बोलत नसतील असे घडते कारण अपेक्षांची पूर्तता न झाल्याने किंवा दुसर्याने दाखवलेला कृतघ्नपणा किंवा परतीची जास्त अपेक्षा ठेवल्याने किंवा संपतीचा नात्यापेक्षा असलेला मोह किंवा तू मोठा झालेला सुखात राहिलेला दुसर्यांना नाही तर जवळच्या माणसांच्या डोळ्यात खूपते म्हणून द्वेष निर्माण होतो .स्वच्छ नाते राहू शकत नाही .हेवेदावे सूरू असतात सर्वच अजिब असते.प्रत्येकजण आपल्या ठिकाणी ग्रेट असतो असे मानले तर मग हेवेदावे होणार नाहित .दुसर्याला हीन समजणार नाहीत .
बघा तुम्हालाही असा अनूभव आला का की स्वता कृतघ्न झालात का? किंवा दुसरा झाला तुमच्या दृष्टीने किंवा दुसर्याची मदत घेतल्याने आज पश्चाताप होतो आहे का?किंवा तुमचे जवळचे माणसे लांब गेले तुमच्या पासून किंवा जवळच्या माणसांशी अबोला धरला आहे का?विचार करा व जीवनाचे गणित सुटतं का तेवढे जमतं का बघा
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment