🌹🌹श्रध्दा और सबुरी🌹🌹
श्रध्दा आणि सबुरी
आहेत दोन्ही बहिणी।
असतात ज्यांच्या जवळ
माणूस होतो सद्गुणी।।
दोन्ही असतात एकत्र
नसतात त्या सर्वीकडे।
माणूस पाहून येतात
अन घेऊन जातात पूर्णत्वाकडे।।
ज्यांच्या कडे श्रध्दा सबुरी
असतो कायम आनंदी।
नाही करत जगाची फिकिर
करतो दुसर्यालाही आनंदी।।
श्रध्दा आणि सबुरीच्या मागे
येतात लक्ष्मी अन शांतता।
अन लक्ष्मीच्या पाठीमागून
येतो ब्रम्हांडाचा अनंता।।
असते प्रत्येकाची श्रध्दा
जगात कुणा कुणावर।
नसेलच जडली श्रध्दा
तर असते किमान स्वत:वर।।
श्रध्दा आणि सबुरीमुळे
जीवन बनते छान।
म्हणून त्यांना जवळ करा
वाटेल स्वत:चा अभिमान।।
श्रध्दा आणि सबुरी होते
म्हणून साई बनला देव।
गरीब श्रीमंत जपतात
आवडीने त्याचे नाव।।
जय श्रध्दा जय सबुरी
वाटतात दोन्ही लहान।
पण त्यांच्या सानिध्याने
माणूस बनतो महान।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment