Skip to main content

योग्य दिशेला हवं का?

योग्य दिशेला घर
आज बर्‍याच लोकांनी भविष्य सांगायला सुरूवात केली आहे तसेच घर कोणत्या दिशेला हवे दार कोणत्या दिशेला हवे किचन कोणत्या दिशेला हवे मग नसेल तर तुमच्या जीवनात अडचणी येणार .रोग येणार पैसा टिकणार नाही .शांतता लाभणार नाही  असले काहीतरी सांगून संभ्रम निर्माण करतात व त्यासाठी पैसे उकळतात उपाययोजना करण्यासाठी .निसर्गाच्या दृष्टीने सर्व दिशा शुभच असतात  व घर कोणत्याही दिशेने बांधले तर तेही शुभच असते .अशूभ असतात माणसाचे विचार ते बदलले की शुभ घटना सूरू होतात .जर ज्यातिषी शास्रानुसार बरोबर असते तर मोठमोठ्या लोकांच्या घरी की ते सर्व वास्तुशास्रानुसार घरे बांधतात त्यांच्या घरी कुणाला आजार येता कामा नये काही नुकसान व्हायला नको कोणता अपघात हौता कामा नये .भरभराट असली पाहिजे पण तसे होताना दिसत नाही .शिकलेला माणूस यावर जास्त भरोसा ठेवतो .बर्‍याच वेळा फांदी मोडायची व कावळा बसायची एकच वेळ होते मग भविष्य सांगणार्‍या लोकांचे फावते.काहीवेळा ठाकठोळे बरोबर निघतात मग माणसाचा विश्वास बसतो तेव्हा हे लोक त्याचा फायदा उठवतात .विचार चांगले ठेवले की आपोआप चांगले घडत जाते मग घर कसेही असले तरी चालते .जे घडते ते घरामुळे नाही तर तुम्ही केलेल्या कर्माने घडते. कर्म चांगले ठेवले की आपोआप चांगले फळ दिसायला लागेल.घरवास्तुशास्रानुसार बांधायचे व कर्म दरिद्री सारखे करायचे मग काय खाक होणार प्रगती घराची व आपली .म्हणून सांगतो अशा लोकांच्या नादी लागू नका . वेळ व पैसा वाया घालवू नका.कोणीही तुम्हाला लिहून देणार नाही की मी सांगितल्या प्रमाणे घर बदलले तेव्हा जर त्या घरी काही नुकसान झाले की भरपाईला मी बांधील राहिल.काहीतरी अंदाज बांधून दूसर्‍याला पटवायचे व पैसा गोळा करायचा.कुणालाही भविष्य सांगता येते उदा. तुमचा पैसा टिकत नाही .तुमचे हितशत्रू तुमच्या घरातलेच आहेत.तुमची प्रगती त्यांना बघवत नाही.मनाला शांतता लाभत नाही.घरामध्ये दोष आहे त्यासाठी उपाय करावे लागतील.मुलांच अभ्यासाकडे लक्ष नसते त्यासाठीही उपाय आहेत .तुमचं आजारपण चालू असतं मोठा आजार येण्याची शक्यता आहे तो येऊ नये म्हणून उपाय आहेतअसले सांगून चांगले पैसे गोळा करायचे व गुरूजींनि उपाय सांगितला म्हणून आपल्या घरी आता आलबेल आहे अस मानून घ्यायचं .त्यांनी सांगितलेल्या उपायांनी तुमच्या मनातील वाईट विचार तुम्ही सोडून चांगले करायला लागतात .तुम्ही स्वता तुमच्या विचारांमध्ये बदल करून घेतला म्हणून चांगले घडत आहे व घरात किटकिट तमाशा न करता शांततेने सर्वाना सामोरे जाता म्हणून घराची प्रगती होते.महागाई आहे व खर्च अफाट असतो मग पैसा कसा टिकणार ?पण तो ते सांगतो व वरून आपण त्याने सांगितले म्हणून  पैसे देतो.सर्वच अंधश्रध्दा आहेत पण लोकांना सांगणार काय?
     विचार करा तुम्ही कोणत्या गुरूजींच्या नादी लागलात का? पैसा गेला का त्यापायी?तुम्हाला असे वरील भविष्य सांगितले का कुणी?असल्या पासून लांबच रहा बघा जमतं का
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...