समज गैरसमज
समज अन् गैरसमज मध्ये
असते मोठी तफावत।
बरेच जण गैरसमज
करून दूरावतात।।
वेळोवेळी करावा दूर
झालेला गैरसमज।
नाहितरी वेगळे रूप
धारण करतो गैरसमज।।
गैरसमज करून घेणे
असते मनाची कमतरता।
विचार करावा भरपूर
मनात ठेवावी शांतता।।
काहीवेळा समज घेते
गैरसमजाची जागा।
पण सत्य असते वेगळे
म्हणून करतात त्रागा।।
समजचे रूपांतर गैरसमजमध्ये
करून घेणारे असतात बरेच जण।
माणसाने वापरावी स्वत:ची बुध्दी
अन् जपावे दुसर्याचेही मन।।
गैससमज दुसर्याचा काढणे
असते फार अवघड।
स्वत:चेच तुणतुणे वाजवून
करतात स्वत:चेच मन जड।।
गैरसमजामुळे जातात व्यक्ती
कायमच्याच एकमेकांपासून दूर।
येतो मनात कडवटपणा अन्
घुसतो मनात आरपार।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment