सकाळ व संध्याकाळ
रोजचीच असते सकाळ संध्याकाळ
नाही खंड त्यात पडला
कधी सकाळ चांगली तर
कधी महत्व येते संध्याकाळला
सकाळी भरतो उत्साह
दिवसभर येतो कामाला
जशी जशी येते संध्याकाळ
होते मात्र थकायला
होते सकाळी कामाला
जायची लगबग फार
कधी ट्रेनने तर कधी बसने
काही वापरतात मात्र कार
सकाळी घरचे सारे
एकमेकांपासून दुरावतात
संध्याकाळी धावपळ करून
घरचा रस्ता पकडतात
संध्याकाळी होते हितगूज
बोलून मन होते मोकळे
रात्री एकत्र जेवण करून
ताणून देतात सगळे
सकाळी उठून माणसे
जातात पैसे कमवायला
संध्याकाळी खिसा रिकामा करुन
घेतात काय काय घराला
रात्री बघतो माणूस स्वप्न
पूर्ण करायला सकाळी उठतो
बर्याच वेळा पडते पदरी निराशा
पण आशेचा किरण खुणावतो
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment