पाऊस
थांब रे थांब रे पाऊसा
पैसा झाला खोटा।
काय होतं तुला
पाऊस आला मोठा।।
माहीत नसतो तुला
का रे सोमवार अन् रविवार ।
कधीही वाटेल तेव्हा बरसतोस
असे कसे रे तुझे विचार।।
येतो तर धुमाकूळ घालतोस
माहीत नाही का रे तुला शांतता।
तुला कुणी रागाने बोललं का
आधी तु असा वेडा नव्हता।।
आला की ट्रेन बंद पाडतोस
बंद होतात सर्व व्यवहार।
फक्त बघत बसावे
तू करत असलेला अत्याचार।।
कधी तर असा गायब होतोस
लोक थकतात तुझी वाट बघून।
पण तुला येत नाही दया
तेव्हा आमचा तमाशा बघतो झोपून।।
तू तर आमचे जीवन आहेस
तू असला तर अर्थ आहे जीवनाला।
पण तू बेभरवशासारखा वागणार
मग आम्ही सांगणार कुणाला।।
तू स्वत:ला बाॅस समजतोस
तक्रार करावि लागेल मालकाकडे।
मग जिरेल तुझी मस्ती
मग बसशील तोंड करून वाकडे।।
हवामानाचा अंदाज सारखा चुकवतोस
त्यांना पाडतो कायम खोटा।
पाऊस येणार नाही असे ते म्हणाले
की पाऊस मुद्दाम पाडतोस मोठा।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment