मावशी काही चूकलं का आमचं
तू होतीस आमचा आधार
तू गेल्याने झालोत आम्ही निराधार
हसतमुख चेहरा येतो डोळ्यासमोर
सांग ना काही चुकलं का आमचं
तुझ्या शब्दाने यायची जगण्याला प्रेरणा
तुझ्या आठवणीविना आता एक दिवसही जाईना
कसं जगावं आम्ही तुझ्याविना
सांग ना काही चुकलं का आमचं
तुझा सल्ला आमच्यासाठी होता अनमोल
आता कुणाकडून प्रेरणा मिळेल
तुझी किंमत आता शत्रूंनाही कळेल
सांग ना काही चूकलं का आमच
सर्व नात्यांना दिला तू योग्य न्याय
तू सर्वांचीच होती प्रेमळ माय
तुझ्याविना आता करमत नाय
सांग ना काही चूकलं का आमचं
एक अधिकारी म्हणून छाप पाडली
म्हणून सर्वजण तुला भेटायला आली
हमसून हमसून सारी जण रडली
सांग ना काही चूकलं का आमचं
सर्व भावांची होती प्रेमळ बहिण
संपले अश्रू त्यांचे रडून रडून
तुला वाचवण्यासाठी झाले प्रयत्न करून
सांग ना काही चूकलं का आमचं
देव का झाला एवढा निष्ठूर
त्यालाही तुझा सल्ला घ्यायचा असेल फार
आता परत यायला नको करू उशिर
सांग ना काही चूकलं का आमचं
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment