नाही विसरलो
विसरलो नाही मी कुणावर
केलेले असतील मी उपकार।
विसरलो मात्र मी माझ्यावर
कुणी केलेले असतील उपकार।।
विसरलो नाही मी आईबाबांनी
केलेले माझ्यावर चांगले संस्कार।
मी मात्र विसरलो करताना
माझ्या मुलांवर चांगले संस्कार।।
विसरलो नाही मी माझ्या घरातील
लोकांनी दिलेले मला भरपूर प्रेम।
विसरलो मी मात्र त्यांना
देतांना खरेखुरे प्रेम।।
विसरलो नाही मी दाखविला
कुणीतरी प्रगतीचा रस्ता।
विसरलो मी मात्र दाखवायला
कुणाला खरा रस्ता।।
विसरलो नाही मी मला दिलेली
कुणीतरी अडचणीच्या वेळी मदत।
विसरलो मी मात्र दुसर्याला
करायची असते प्रसंगी मदत।।
विसरलो नाही मी माझ्या
शिक्षकांनी दिलेले ज्ञान।
विसरलो मी मात्र माझ्या
विद्यार्थ्यांना देतांना ज्ञान।।
विसरलो नाही मी मित्रांनी
दिलेला संकटावेळी दिलेला हात।
विसरलो मात्र मी त्यांनाही
द्यायचा असतो आपला हात।।
विसरलो नाही मी घेतांना
नोकरीचा पगाराचा पैसा।
विसरलो मात्र मी देतांना
गरजवंताना पैसा।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment