नतमस्तक
कुणाही पुढे न व्हावे नतमस्तक।
असावा तो सद् गुणांचा लायक।।
नतमस्तक न व्हावे लाचारीने।
असावा तो आदर्श आचाराने।।
नतमस्तक संतापुढे व्हावे।
अविचारीं पासून दूरच राहावे।।
नतमस्तक व्हावे परमेश्वराजवळ।
त्यासाठी न बघावा वेळ काळ।।
नतमस्तक आईपुढे व्हावे।
तिच्या शब्दाविना न काही करावे।।
नतमस्तकाने होतो माणूस नम्र।
म्हणून देवाकडे मन करावे एकाग्र।।
नतमस्तक म्हणजे पूर्ण शरणांगती।
ती म्हणजेच आपली मनाची प्रगती।।
विचार करूनच नतमस्तक व्हावे।
समोरची व्यक्ती पारखूनच तसे करावे।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment