Skip to main content

आयुष्यातला सिग्नल

आयुष्यातला सिग्नल
जेव्हा सिग्नल हिरवा पडतो तेव्हा गाड्या लोक चालू करतात व तो पार करतात पण जेव्हा काही एक दोन सेकंदात तो लाल होणार असतो तेव्हा लोकांची तो पार करण्याची कितीतरी धावपळ व हाॅर्नचा आवाज असे दृश्य बघायला मिळतं तसंच आयुष्याचं असते .तरूणपणी माणूस बेभान असतो कसाही वागतो पण जेव्हा त्याला सिग्नल मिळायला सुरूवात होते की आपले आयूष्य कधीपण  संपणार तेव्हा जीवनात काय काय गोष्टी करायच्या राहून गेल्यात त्या करण्यासाठी धडपडू लागतो मग कुणाला लांब परदेशात जायचं असते त्यासाठी बुकिंग करतात कुणाला विविध प्रकारचे कपडे घालायचे असतात तसे घालण्याचा प्रयत्न करतात .काहींना नात्यात आलेली कटूता संपवायची असते .काहिना दानधर्म करायचा असतो .काहीना खूप वेगवेगळे पदार्थ खायचे असतात .काहिना मुलांवर सूनेवर नातवंडावर प्रेम करायचे असते त्यांना गिप्ट द्यायचे असतात .काहिना ड्रायव्हिंग शिकायची असते .काहीना निसर्गरम्य ठिकाणी जायचं असते .काहीना घरात आवडीच्या वस्तू घ्यायच्या असतात.काहीना जून्या मित्रांना वेळ द्यायचा असतो तर काही आपल्या जोडीदारा बरोबर लांब फिरायला जायचे बेत आखतात .जीवनभर हे कधिच सूचतं नाही पण सिग्नल मिळाल्यावर काय करू आणि केव्हा करू या विचारांची गर्दी मनात पिंगा घालते काही यशस्वी होतात पण काहिंच्या नशिबात मात्र ह्या गोष्टी स्वप्नच राहून जातात म्हणून योग्य वयामध्ये जर का ह्या गोष्टीचे नियोजन केले असते तर उतारवयात अशी धावपळ होत नाही तसेच ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी शरीर व मन साथ देत नाहीत पैसा असतो पण तब्बेत साथ देत नाहित म्हणून वेळिच सावध व्हायला बरे व मनासारखे आयुष्य जगले पाहिजे नाहितर म्हणायची वेळ येईल की सर्व करायचं राहूनचं गेले .बघा विचार करा तुमच्या ही काही गोष्टी राहून गेल्या का?
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...