अंबरनाथ खड्ड्यांच शहर
जरा बघा जाऊन अंबरनाथला
खड्ड्यांचा रस्ता म्हणजे काय असतो।
जिकडे तिकडे खड्डेच खड्डे
जीव मुठीत धरून माणूस चालत असतो।।
चालतात रिक्षा बोटीसारख्या
कधी उलटतील सांगता येत नाही।
राजकारणी आहेत गंमत बघत
कुणाला काहीच पडलेलं नाही।।
खड्ड्यांत रस्ता असतो कसा
हे अंबरनाथला जाऊन बघावे।
पाहून होतो फार संताप
पण सत्ताधार्यांना काहीच पडलेले नसावे।।
खड्ड्यांमुळे झाला रस्ता गायब
चालतांना होते माणसांची हालत।
निवडून दिले होते ते यासाठीच
असे सर्वजण दिसतात फक्त बोलत।।
निवडणूक आली की मागतात
मतांचा सर्वीकडे जोगवा।
निवडून आले की मग मतदार
धाडतात मागण्यांचा सांगावा।।
निवडून दिलेल्यांना कस काहिच
खड्ड्यांचे वाटत नाही।
खड्डे बघून स्वत:च्या मनाची
लाजच काही राहिली नाही।।
पब्लिक फक्त सहन करते हाल
बिचार्यांना कुणीच दिसत नाही वाली।
सत्ताधारांनी बांधली डोळ्यावर पट्टी
दिलेली वचने नाही त्यांनी पाळली।।
प्रा, दगा देवरे
Comments
Post a Comment