झोप उडते
आपली आवडती व्यक्ती
भेटली की उडते झोप।
गगनात मावत नाही आनंद
उतरतो सर्व ताप।।
जवळची व्यक्ती जेव्हा
करते आपला विश्वासघात।
तेव्हा उडते आपली झोप
अन् होतो मनावर आघात।।
चूक जेव्हा होते आपल्याकडून
तेव्हा होते झोपेचे खोबरे।
करतो माणूस पश्चाताप
वाटतं नाही मनाला बरे।।
कुणी करतो आपला अपमान
झोप तेव्हा पळून जाते।
संतापाच्या आगीत होरपळून
मनाची शांती निघून जाते।।
मन व शरीर साठी झोप
आहे मिळालेले वरदान।
काहीही झाले तरी करू
नये वरदानाचा अपमान।।
झोप म्हणजे असते झोप
नाही बोलवली तरी येते।
आली तर होऊन जाते एकरूप
तिच्यामुळे जगाला विसरायला होते।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment