तुझं माझं
तुझंच चुकलं माझं नाही
मी कायम असतो बरोबर
तुलाच काही समजतं नाही
नको येऊ माझ्या समोर
मी केली होती मदत तुला
तू केली ते आठवत नाही
तू बोलला होता कठोर शब्द
मी ही बोललो हे माहीत नाही
मी धावत आलो होतो तुझ्यासाठी
तू कधी धावला हा विचार येत नाही
मी केले बर्याच वेळा तुझ्यासाठी
तू ही केले हे ध्यानात येत नाही
केली मी कायम तुझ्यासाठी तडजोड
तू ही केली असेल कदाचित
माझी तडजोड होती महत्वाची
तुझी तर येतच नाही माझ्या लक्षात
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment