पत्रिका
पत्रिका बघून जुळलं जातं लग्न।
तरी मोडले जातात का बरे लग्न।।
पत्रिका बघून गुण सारे जुळतात।
तरी का एकमेकांपासून दूरावतात।।
पत्रिकेत नसतो अडथळा शनिचा।
तरी का दिवस येत नाही सुखाचा।।
पत्रिकेत दिसते सर्व ग्रहांची मदत।
पण संकटात कुणी येत नाही धावत।।
पत्रिकेत सांगतात आहे पैशांचा महापूर।
प्रत्यक्षात पैशांचे दर्शन होत नाही दूरवर।।
पत्रिकेत दिसते जोडीदाराचा शांत स्वभाव।
प्रत्यक्षात असतो शांततेचाच अभाव।।
पत्रिकेत दिसते चारचाकी गाडी।
पण हाती येते मात्र हातगाडी।।
पत्रिकेत असते स्वताचे चांगले घर।
पण मालक म्हणतो भाडे भर नाहीतर खाली कर।।
असते जे जीवनात ते बर्याच वेळा नसते पत्रिकेत।
कामी येते तुमची श्रध्दा अन मेहनत।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment