पाळलेला कावळा
नव्हते आजपर्यंत बघितले
कुणी पाळलेला कावळा।
अशी कशी कल्पना सूचली
माणूस झाला बावळा।।
कावळा सोडून पाळतात
माणसं सर्व प्रकारचे पक्षी।
सीमा ओलांडली माणसाने
कावळा पाळला ह्या वर्षी।।
कावळा पाळून सुरू केला
माणसाने नवीन अजिब धंदा।
लढवली नवीन शक्कल
कारण नसेल मिळत कामधंदा।।
भाद्रपदात श्राध्दला बघतात
लोक कावळ्याची वाट।
तो काही फिरकत नाही
लावतो माणसाच्या संयमाची वाट।।
आता नको कावळ्याची चिंता
मिळेल भाड्याने कावळा।
दहा वीस रूपये देऊन
शिवेल पितरांच्या ताटाला।।
प्रत्येक गोष्टीत शाॅटकट
माणूस शोधून ठेवतो।
असला प्रकार बघून
देव ही सलाम करतो।।
प्रा. दगा देवरे कावळा
Comments
Post a Comment