मी
मी मी म्हणणारे आहेत बरेच जण
समजतात ते स्वत:लाच शहाणे।
बोलताना नसतो नम्रपणा
काहीवेळा करून घेतात स्वत:चे हसणे।।
मी मी म्हणणारे गेलेत मातीत
नाही राहीला त्यांचा ठावठिकाणा।
मातीमोल झालेत त्यांचे संसार
कुणी नाही करत त्यांची विचारणा।।
रावण कंसासारखे मी मी करणार्यांची
लावली नियतीने पूरी विल्हेवाट।
अहंकार घमेंड श्रीमंतीचा माज उतरून
केला त्यांचा कायमचा कडेलोट।।
मी मी म्हणणार्यांची संख्या
नाही होणार जगात कमी।
भानावर नाही आले अजून
सारखे करतात तू तू मी मी।।
मी मी करून उपजले किती
अन् किती मातीत मिळाले।
तरीही माणूस करतो मी मी
नाही शहाणपण त्यांना कळाले।।
मी मी करण्याने बळावतो अहंकार
वाटतात सर्वजण त्यांना कसपटासमान।
शेवटी मात्र होते त्यांची फजिती
नियती दाखवते त्यांना आसमान।।
मी मीपणा गळून पडावा
बोलावे सर्वाशी आपूलकीने।
एक दिवस सर्वंच जगातून जाणार
मग का वागावे तिरसटपणे।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment