पाणी नसते तेव्हा
पाणी नसते जेव्हा घरी
असतात सर्वजण चिंतेत।
काहीच काम सुचत नाही
करतात बाहेर अन आत।।
पाणी नसते जेव्हा घरी
सर्व विषय पडतात बाजूला।
सर्वांच्या मनात एकच प्रश्न
कधी येईल पाणी नळाला।।
पाणी नसते जेव्हा घरी
होते बाहेरच बरीच भटकंती।
इच्छा नसूनही जातात बाहेर जेवायला
अन सर्वजण रेंगाळतात अवतीभवती।।
पाणी नसते जेव्हा घरी
शांतता पडते पटकन बाहेर।
मग हळूच शिरतो राग घरात
जसा दरोडा पाडणारा चोर।।
पाणी नसते जेव्हा घरी
घरात पसरतो दुर्गंध।
मनातही येत नाही कधी
दुसरे विचार विविध।।
पाणी नसते जेव्हा घरी
वाटायला लागते महत्व।
पाणी म्हणजे जीवन
विसरायला होते बाकीचे तत्व।।
पाणी नसते जेव्हा घरी
घरातले लोक दिसतात एकत्र।
एरव्ही बोलायला वेळ नसतो
फिरतात पाण्यासाठी सर्वत्र।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment