खरे रूप
माणसाचे वेगळे असते खरे रूप
ते दिसत नाही बर्याच वेळा।
एखादी घटना घडली अचानक
तर ते बाहेर पडते एक वेळा।।
खर्या रूपाने वावरणे असते अवघड
म्हणून तो कधी नाही दाखवतं।
एखादी कृती घडली मनाविरूध्द
की लोकांना अचानक नजरेत पडतं।।
खरे रूप बाहेर पडण्यासाठी
यायला हवा प्रचंड राग।
तो बघून माणसं आश्चर्याने
काढतात तेथून आपला माग।।
बर्याच वेळा कठिण असते
ओळखणे खरे व खोटे वागणे।
माणूस मात्र कायम फसतो
इतरांच्या खोट्या वागण्याने।।
माणूस करतो स्वत:चीच फजिती
खोटे वागून झाल्याची।
हिंमत नसते त्याच्यात
खर्याला सामोरे जाण्याची।।
काहीवेळा खर्यापेक्षा खोटे
असते माणसासाठी चांगले।
परिस्थिती बघून ठरवावे
आपले खरे खोटे रूप निराळे।।
क्षणात बदलतात माणसे रूप
सरडा पडतो त्यांच्यापुढे फिका।
अभिनयात असतात फार तरबेज
कमी पडतो आपण समजण्यात त्यांचा अवाका।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment