परिवार
असावा प्रत्येकाला छान परिवार।
हसत खेळत जावा प्रत्येक वार।।
परिवारात असावा एकमेकांबद्दल विश्वास।
सर्वाभोवती असावा प्रेमाचा सहवास।।
परिवारात नको माणसांची फक्त गणती।
एकमेकांसाठी झटावे हिच ठरावि आहूती।।
परिवारात मीपणाला नको कोणती जागा।
कुणाचे उणेदूणे काढून करू नये त्रागा।।
परिवार म्हणजे असते तुमची ओळख।
टोचून बोलून न द्यावे कुणाला दु:ख।।
ज्याचा परिवार असतो सुखी।
त्याचे नाव असते सर्वामुखी।।
परिवार हा परिवारच असतो।
तो आठवड्याचा कोणता वार नसतो।।
आनंदी असतो ज्याचा परिवार।
त्यांच्यासाठी शुभ असतात सर्व वार।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment