घर
घर म्हणजे नुसते विटा
मातीच्या भिंती नसतात
तेथे आपल्या जीवनाचे
प्रेमळ माणसे असतात
घर म्हणजे नुसता
राहण्यासाठी निवारा नसतो
स्वप्न पूर्ण करण्यासाठी
तेथे असणार्यांचा पाठिंबा असतो
घर म्हणजे नुसती
झोपण्याची जागा नसते
तर मन व शरीराला
उभारी येण्याचे ठिकाण असते
घर म्हणजे माणसाचे
जीवनाचे असते मंदिर
तेथे असतो खर्या
माणसारूपी देवांचा वावर
घर म्हणजे असते
सर्वांत चांगले शांतीचे ठिकाण
हेच तर असते खरे
माणसाचे विश्रांती स्थान
घराकडे लोकांना असते
कायम जायची घाई
कारण घरात नांदत
असते आईरूपी रखुमाबाई
स्वातंत्र्याचा खरा उपभोग
घेतो आपणआपल्या घरात
तेथे असतो आपण मालक
म्हणून असतात सर्व आनंदात
घर म्हणजे झोपडी
असते तरी चालते
घरामधील लोकांमध्ये असावे
प्रेमाचे आपुलकीचे विश्वासाचे नाते
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment