जळमटं
साफ नाही केले घर
तर लागतात जळमटं घराला
चालू केला असता पंखा
लागतात इकडे तिकडे उडायला
जळमटं होतात कपाटात
कधी दिसतात छतावर
ट्यूबलाईटलाही झाकोळून टाकतात
म्हणून साफसफाई घ्यावी मनावर
जळमटंही लागतात मनाला
पण लक्ष नसते कुणाचे
ते दिसतात मात्र दुसर्याला
नुकसान होते स्वत:चे
जळमटांनी पसरते रोगराई
पैसा व वेळ घेऊन जाते
म्हणून सावध राहावे नेहमी
उपाय करण्याने स्वच्छता मात्र होते
जळमटं बरोबर घेऊन येतात
किटकं मुंग्या अन झुरळं
खराब करतात ते घराचे आरोग्य
त्यांना मारण्यासाठी न दवडावी मात्र वेळ
ज्या घरी होतात जळमटं
त्या घरचे माणसे आळशी
आळसाने बिघडते मनस्थिती
अन् रोग बसतात उराशी
घरी जावून बघा पंख्याकडे
दिसतील तुम्हाला जळमटं
करत जा मध्ये मध्ये साफ
मग रोगराई धरेल बाहेरची वाट
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment