एक सावधानता बाळगावी
जीवनात सावध राहिलेले फार बरे असते .आपले मित्रमंडळी असतात तेव्हा आपल्याला सुरक्षित वाटते .प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी share करतो व आपल्या मनातील दडपण कमी करतो बर्याच वेळा घरच्या लोकांना आपल्या गोष्टी माहीत नसतात पण मित्रमंडळीना माहीत असतात कारण तेवढा विश्वास आपला त्यांच्यावर असतो त्यामुळे आपले मन हलके होते व ते भेटले की आपण आनंदीत होते पण मित्र व सहकारी यांच्यात जमीन असमानचा फरक असतो किंवा खरे मित्र व खोटे हे ओळखायला आले पाहिजे .खरा मित्र आपली कधीही फसवणूक करत नाही तो आपले भले व्हावे असेच चिंतत असतो त्यापासून कधीही धोका
नसतो पण काहीवेळा आपण मित्र ओळखण्यात चूक करतो आणि आपल्या व्यक्तिगत गोष्टी आपण सांगून मोकळे होतो एक विश्वास असल्याने आपण आपले मन मोकळे करतो पण त्या व्यक्तीमध्ये व आपल्यामध्ये काही मतभेद झालेत तर मात्र त्याला आयते कोलीत मिळते व आपण जे सांगितले private गोष्टी त्याला तो जगजाहीर करायला सूरवात करतो व तेथेच आपला विश्वासघात होतो .खरा मित्र असेल तर काही झाले तरी तो अशा private गोष्टी कधीच जगजाहीर करणार नाही व बदनामी करणार नाही कारण समोरच्याने काहीतरी विश्वास टाकूनच फक्त आणि फक्त तुम्हाला सांगितलेले असते तसेच काही व्यक्ती एका पक्षातून दुसर्या पक्षात जातात तेव्हा ज्या पक्षाने आपल्याला मान सन्मान दिला त्याच पक्षाचे निगेटीव गोष्टी हेरुन त्याचीच नंतर बदनामी करायची असे राजकारण सर्वीकडे असते पण खरा व्यक्ती कधीही असे करनार नाही .म्हणून मित्र संख्याने भरपूर असण्यापेक्षा मोजकेच पण विश्वासू असले पाहिजे .शत्रूत्व झाले तरी आपला विश्वास ते जपनारे हवेत .मित्र ह्या शब्दामध्येच मीआहेम्हणजे एकरूपच दोघे . त्याचा अपमान करणे म्हणजे स्वताचा अपमान होणे.मित्रांमध्ये टिंगळटवाळी चालतच असते पण ती तात्पूरती असते.शेवटी दोघांना कुणीच अलग करू शकत नाही व ते ही राहू शकत नाही .काही व्यक्तींना ओळखण्यात पूर्ण जीवन निघून जाते पण एखादा प्रसंग घडतो व खाडकन डोळे उघडतात व त्या क्षणी आपण त्याला पूर्ण ओळखतो.जीवाला जीव देणारे मित्र असतात .एकाला जखम झाली की दुसर्याच्या डोळ्यात पाणी येते.त्याच्या नुसत्या आठवणीने मन उचंबळून येते व जगायला प्रेरणा मिळते .त्याची आठवणच जगायला उत्साह निर्माण करते.तो नसला किंवा बोलला नाही की जीवन निस्तेज वाटायला लागते .बघा आहेत का तुमच्या जीवनात असे मित्र आणि असले तर तुम्ही जगात सर्वात श्रीमंत व भाग्यवान आणि तुम्हीही आहात का कुणाचे असे खास मित्र की जो तुमच्याजवळ बिनधास्तपणे त्याचे मन मोकळं करु शकणार .विचार करा
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment