चिरंतन झोप
झोप तर माणसाला मिळालेली अनमोल भेट आहे .थकून भागून आल्यावर जी येते ती झोप .झोपेमुळे माणूस ताजातवाना होतो व परत कामाला लागतो .झोप अपूर्ण झाली तर कामाकडे लक्ष लागत नाही .झोपेमुळे थकवा निघून जातो.झोपतो माणूस गाढ पण झोपेमध्ये स्वप्न पडतात .शरीराच्या सर्व क्रिया चालू असतात .झोपमुळे माणूस स्वत:च्या शरीराला विसरतो पण शरीरातले सर्व अवयव आपल्या कार्यामध्ये मग्न असतात व त्याचा थांगपत्ता माणसाला काहीच नसतो मग आपोआप झोपेतून बाहेर येतो .पण नियतीने प्रत्येक प्राण्याला चिरंतन झोप बहाल केली आहे .माणसाला बर्याच वेळा रोगाने पछाडले जाते त्यामुळे त्याला बराच त्रास होतो .जीवन दु:खमय होऊन जाते कुणीच त्यातून सुटका करु शकत नाही अशावेळी नियती चिरंतन झोप बहाल करते .त्याचचं दूसरं नाव मृत्यू .त्या झोपेमुळे सर्व त्रासातून त्याची सुटका होते .तीअशी झोपअसते कीत्याला गाडले काय किंवा जाळले काय त्याला काहीच फरक पडत नाही .चिरंतन झोपेमुळे शरीर नष्ट झाले तरी तो झोपेतून जागा होऊ शकत नाही .अशी झोप की पूर्ण शरीर माती झालेल .माती व शरीर मध्ये काहीच फरक नसतो.लोक म्हणतात तो गेला शरीरातून आता शरीर जाळून टाका.त्याला नाही तर शरीराला जाळतात .सर्वांना वाटतं तो तर कधीच उडून गेला कधीही न येण्यासाठी व कधीही कुणाला न दिसण्यासाठी.कायमचाच दिसेनासा होतो .हे घडतं फक्त चिरंतन झोपेमुळे.ती कधी आणायची हे नियतीच्या हातात असते.माणसाला त्याचा थांगपत्ताही नियती लागू देत नाही आणि 99% ती जो लोकांना आवडतो त्यालाच आणते चिरंतन झोप लवकर.विवेकानंद शिवाजी महाराज तुकाराम ज्ञानेश्वर मुक्ताई निवृती सोपान बाकीचे अनेक संत तसेच लालबहाद्दूर शास्री नेहरू असे अनेक महान लोकं ऐन तारूण्यातच गेले . प्रत्येकाला ही झोप येणारच असते .फरक इतकाच की काहींच्या नशिबी यातना न होता येते तर काहींच्या नशिबी आजार अपघात यांचे निमित्त करून येते .विधात्याकडे कोणता हिशोब असतो ते त्यालाच माहित कारण काहीच्या बाबतीत ती झोप लवकर का देतो व काहीना मागूनही मिळत नाही काहीना यातना सहन केल्यानंतर देतो .त्याचे गणित आजपर्यंत कुणाला सुटलेले नाही व सुटणार ही नाही.बघा तुम्हाला त्याचे गणित सुटतं का?
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment