तुला काय वाटतं
अपेक्षा करतो प्रत्येकजण
दुसर्या जवळ काहीतरी
पण कधी नाही विचारत
तुलाही वाटतं असेल काहीतरी
आपले मन सर्वांनी जपावे
दुसर्याचा कुणी नाही करत विचार
झाले सर्वांचे मन स्वार्थी
नाही विचारत तुलाही असेल विचार
आपलेच म्हणणे करतात खरे
दुसर्याला मनच नसते
समोरचा करत राहतो तळमळ
पण त्याच्या तळमळीशी घेणेदेणे नसते
समोरचा असेल कदाचित खरा
हा विचार शिरू द्यावा मनात
अविचाराने एक पाऊल मागे यावे
मग खरी गोष्ट येईल ध्यानात
लोकांच्या तोंडाला नसते कुलूप
बोलत सुटतात न पटणारे
वेळच शिकवते अशावेळी
आपण न बनावे फक्त ऐकणारे
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment