राग
असतो राग प्रत्येकाजवळ
दाखवून देतात दुसर्याला।
आवरायला असतो कठिण
त्रास होतो मात्र स्वत:ला।।
म्हणतात राग मारला
त्याने मारला वाघ।
राग असतो माणसाचा शत्रू
म्हणून माणसा शांततेकडे बघ ।।
रागाने लावली भल्याभल्यांची वाट
पडलेत बरेच जण खितपत तुरूंगात।
नाही आवरता आला त्यांना राग
केला रागानेच त्यांचा घात।।
हरवून बसतो माणूस रागाने विवेक
नष्ट होते चांगल्या विचारांची शक्ती।
नको ते रागात होऊन जाते
म्हणून करावी शांततेची भक्ती।।
राग घेऊन येतो बरोबर हिंसा
हिंसेने करतो सर्व बरबाद।
पश्चाताप करून नसतो उपयोग
तोपर्यंत झालेला असतो महिमा अगाध।।
पण अन्यायाविरूध्द राग येऊन
अन्यायाचा केलाच पाहीजे प्रतिकार।
नाहीतर वाईट लोकांचे फावेल
अन् करत सुटतील अत्याचार ।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment