सच्चा मित्र
आज सच्चा मित्र आहे मिळणे अवघड
जो घालील आपले अपराध पोटात।
धावून येईल कायम मदतीला
नाही येऊ देणार ही गोष्ट ओठात।।
मन मोकळे करता येईल त्याच्याजवळ
वाटेल जगायला त्याचा आधार।
नको वाटायला त्याच्याजवळ कोणता संकोच
पळून जावे त्याच्यामुळे दु:खं दूर।।
घेईल तो आपली मस्करी गंमत म्हणून
राग असेल त्याचा लटका।
करेल माफ झटकन आपल्याला
नाही करून जाणार आपल्याला पोरका।।
हक्काने मारता यावी त्याला हाक
वेळ काळ न बघता यावे त्याने धावत।
असतो मित्र असा कधी कधी
कुणाच्या भाग्यवानच्या नशिबात।।
आपणही व्हावे असा सच्चा मित्र
दोन शरीर अन एक आत्मा।
दोन मन अन एकच विचार
भेट घडून आणतो अशांची परमात्मा।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment