तडजोड
रोजच करावी लागते प्रत्येकाला तडजोड।
नाही चालत प्रत्येक ठिकाणी सडेतोड।।
तडजोड केली नाही ज्याने जीवनात।
असतो दूर यशापासून दोन हात।।
तडजोड म्हणजे माघार नसते।
झेप घेण्याची ती तयारी असते।।
तडजोडचे दुसरे नाव आहे जीवन।
त्यामुळे शांत होते आपले मन।।
दुसर्याच्या आनंदासाठी करावी तडजोड।
काहीवेळा घालावी मनाला मुरड।।
तडजोड शिवाय सुटत नाही जीवनाचे गणित।
म्हणून तडजोडला महत्व द्यावे अगणित।।
तडजोड असते शक्ती मनाची।
परिक्षा असते ती संयमाची।।
तडजोडने शत्रुता होते नाहीशी।
माणूस जोडला जातो मैत्रीशी।।
तडजोडशिवाय नसतो काहीवेळा पर्याय।
प्रश्न सुटण्यासाठी आहे तो रामबाण उपाय।।
सकाळ पासून माणूस तडजोडच करतो।
कारण त्याला वाद नको असतो।।
अहिंसेचा जन्म होतो तडजोडीने।
म्हणून अंगिकारावी ती पोटतिडकीने।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment