मृत्यू
जो जन्माला येतो तो घेऊनच येतो मरण
ते येण्यासाठी पुरते क्षुल्लक ही कारण
राजा असो रंक असो नाही चुकले कुणाला
एक दिवस भेट द्यावी लागते त्याला
गरीब श्रीमंत हा भेद नसतो त्याच्याजवळ
बघतो फक्त त्यासाठी योग्य ती वेळ
बडे बडे हरले त्याच्या समोर
हळूच उचलून नेतो सर्वांपासुन दूर
किती आले अन् किती नेले
कायमसाठी कुणीच नाही उरले
छेदून जातो कोणताही कडक संरक्षण पहारा
नाही लागत त्याला कुणाचा आसरा
करतो सुटका काहींची आजारपणातुन
म्हणून मृत्यू ठरतो काहींना वरदान
मृत्यूने नाही सोडले आजपर्यंत कुणाला
त्यामुळे भल्याभल्यांचा अहंकार गळून पडाला
वय वेळ नाही बघत तो कधी
आवडतो त्याला उचलून नेतो आधीमधी
जरी अवेळी नेले तरी तक्रार करावी कुणाला
त्यालाच सांगतात शांती लाभू दे आत्म्याला
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment