अपरिचित
करतात रोजच प्रवास ट्रेनने
असतात सर्व अपरिचित
रोजच नवनवीन दिसतात चेहरे
कुणीच कुणाला नसते ओळखत
कानाला air phone लावून
दिसतात सर्व धुंदित आपल्या
कुणाचे कुणाकडे नसते लक्ष
वावरतात सर्व जगात आपल्या
दिसतो फक्त माणसांचा समुह
नसते कुणाबद्दल प्रेम न आपुलकी
आले स्टेशन जातात सर्व उतरून
शिल्लकच नाही थोडीशीही माणूसकी
भांडण झाले कुणाचे तर मग
सर्वच आपले कान टवकारतात
सोडण्यासाठी कुणीच येत नसते
फक्त गंमत सारे आवडीने बघतात
फोर्थ सिट जरी मिळाली
तरी मानतात नशिबवान
काहीतरी केला पुरूषार्थ
असेच म्हणते सर्वाचे मन
दिवसभर नसतो कुणाचा
चेहरा खास ओळखीचा
नवीन दिवस पुन्हा होतो सूरु
परत संग होतो अपरिचितांचा
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment