तिसरा डोळा
असे म्हणतात की प्रत्येक माणसाला तिसरा डोळा असतो व जीवनभर बंद असतो पण काही घटना अशा घडतात की तो डोळा अचानक उघडतो व जे दिसले नाही आतापर्यंत ते ही लख्ख प्रकाशाप्रमाणे दिसू लागते उदा. आपल्या जवळ टूव्हिलर किंवा कार असेल तेव्हा आपण वेगात तिला चालवतो त्यावेळि तिसरा डोळा बंद असतो व एक दिवस आपल्याकडूनच अपघात घडतो त्यात समोरच्याचे बरेच नुकसान झालेले असते किंवा जीवही गेलेला असतो मग पोलीस स्टेशन जेल अशा वार्या सुरू होतात .शिक्षा होते दंड होतो आणि शिक्षा भोगून आल्यावर आपला तिसरा डोळा उघडतो व गाडी चालवतांना सर्व स्पष्ट दिसायला लागते त्यामुळे फार काळजीपूर्वक आपण गाडी चालवतो पूर्वी गाडी चालवणे व आता चालवणे यात जमीन आसमानचा फरक असतो तसेच घरातील लोकांना आपण गृहित धरतो पण घरातील एखाद्या सदस्य जेव्हा मृत्यूच्या दाढेतून वाचतो तेव्हा आपला तिसरा नेत्र उघडतो व त्यानंतर आपण विशेष काळजी घ्यायला लागतो तसेच स्वत:काहीपण खाल्ले तरी चालेल या भ्रमात आपण राहतो जेव्हा डाॅक्टर सांगतात की गोड खाल्ले की अमूक होणार तेव्हा आपला तिसरा नेत्र उघडतो व काळजीपूर्वक आपण खातो तसेच कामाच्या ठिकाणी काही चूक झाली तर वरिष्ठांकडून कानउघडणी होते तेव्हा आपला बंद असलेला तिसरा नेत्र उघडतो व त्यानंतर फार जबाबदारीने आपण काम करू लागतो तसेच एखाद्या कडून दगाफटका झाला मग पैशांबाबत असो प्रेमाबाबत असो मैत्रीबाबत असो घराच्या व्यवहाराबाबत असो अजून कशाच्या बाबतीत असो .तेव्हा तिसरा नेत्र उघडतो व सावधतेने आपण पाऊल उचलतो .काही लोक फार कोडगे असतात काही झाले तरी त्यांचा तिसरा नेत्र उघडतचं नाही .बघा विचार करा तुमचा तिसरा नेत्र कशाबाबतीत उघडला आहे का? नसेल तर उघडण्याचा प्रयत्न करा
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment