मराठी भाषा दिवस
आजच्या दिवसाला देतो लाख लाख शुभेच्छा
मराठी भाषेची प्रगती व्हावी अशी करतो इच्छा
मराठी भाषेचा आहे आम्हाला अभिमान
तिच्यामुळेच आमची ताठ राहिल मान
ज्ञानेश्वर माऊलींनी गायिले महत्व मराठीचे
म्हणून तर अर्थ समजले गीतेचे
संतानी लिहिले अभंग मराठीत
आहेत त्यामुळे बर्याच जणांचे मुखोदगत्
माय मराठी आई मराठी
जय जय भाषा मराठी
मराठी भाषा आहे अक्षरांनी श्रीमंत
दागदागिने घालून दिसते मस्त
काना वेलांटी मात्रा उकार
माथी बिंदू लावून दिसते उपवर
मराठी दिसते माझी जशी नवी नवरी
पण आले संकट तिच्यावरी
बोलायला सोपी पण लिहायला आहे अवघड
बर्याच जणांचे उच्चार नसतात धड
मराठी शाळांकडे फिरवली पालकांनी पाठ
म्हातारी दिसते असुनही तरणीताठ
सरकार दरबारी नाही मिळत तिला उचित न्याय
बिचारी टाहो फोडते माझी मराठी माय
मराठी वाचवा बोलणार्यांचे मुले आहेत इंग्रजी शाळेत
फुकटचे भाषण लोकांसमोर फक्त ठोकतात
मराठी भाषा नाही अनिवार्य काॅलेजला
तिच्या मावश्या आहेत तिच्या स्पर्धेला
आम्ही बोलतो मराठी लिहितो मराठीत
गातो मराठी भांडतो मराठीत
जय जयकार करतो मराठीचा
अभिमान आहे आम्हांला तिचा
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज
Comments
Post a Comment