सुख
प्रत्येकाला सुख हवं असत दु:ख कुणालाच नको असते .शरीरात प्रत्येकाला उर्जा हवी असते मग ती कशी मिळते त्यासाठी प्रत्येकाला घरापासून लांब आपल्या लोकांपासून लांब गेल्याने तसेच स्वत:पासून लांब गेल्यानेच मिळते तुम्ही अमेरिका जपान किंवा कोणत्याही देशात गेलात .दिवसभर फिरलात मोठ्या हाॅटेलमध्ये जेवलात हवी ती मजा केली तेव्हा तुम्हाला थकायला जाणवेल व अशी स्थिती येणार की आता बस झालं. डोळे दुखयला लागतील तसेच पायही जडहोतील डोकं गरगर करायला लागेल कुणी पंचपक्वान्न आणून दिले तरी तुमची इच्छाच होणार नाही कुणी तुम्हाला बोलवल चल थोडे अजून फिरून येऊ तरी तुम्ही जाणार नाहीत .कारण तुम्हाला झोप हवी आहे .झोप म्हणजे काय असते सर्व लोकांपासून लांब तसेच स्वत:लाही विसरायचं असते .शरीराला सुध्दा विसरायचं असत तर आणि तरच मनाला शांती मिळेल व सर्वांना विसरून वेगळ्याच स्थितीमध्ये जाता अवतीभोवती कोण आहे याचे भान नसते अपण कोण आहोत याचेही भान नसते आणि अशा detachment मुळेच आपले मन हलकं होते व आपल्यात पुन्हा उर्जा तयार होते व फ्रेश वाटायला लागते त्यामुळे तो कुणी का असेना पंतप्रधान असो राष्र्टपती असोकिंवा कुणी मोठा अधिकारी असो तो झोपेत विसरतो की आपण कोण आहोत व दिवसा किंवा रात्री त्याला त्या स्थितित जावेच लागणार त्याशिवाय त्याचे मन व शरीर प्रसन्न होणार नाही म्हणूनच प्रत्येकाला मृत्यूरूपी चिरकाल झोप देऊन तो आपल्या मनाला सतेज व नवीन उर्जा पुरवत असतो की त्या चिरकाल झोपेमध्ये अपण कोण आहोत व आपल्या शरिराचे काहीही केले तरी आपल्याला त्याची जाणीव नसते पण जेव्हा त्या चिरकाल झोपेतून जागे होऊ तेव्हा मात्र आपण परत नवीन उर्जाने पुन्हा कार्यरत होऊ नवीन जन्मात.म्हणून मृत्यू ही एक प्रकारची झोप आहे किंवा चिरकाल झोपेची अवस्थाआहे पण झोपेतून नक्किच उठवणार पुन्हा नवीन शरीर नवीन उर्जा घेऊन त्यावेळी पहिली पाटी पुसलेली असेन .बघा पटतात का विचार
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment