Skip to main content

क्रिया तशी प्रतिक्रिया

क्रिया आणि प्रतिक्रिया
जेथे क्रिया असते तेथे प्रतिक्रिया ही घडत असते .सहजच होणारी क्रिया असते पण प्रतिक्रिया तरीही मिळतेच.आपल्या ध्यानीमनी नसताना क्रिया करून मोकळे होतो पण त्याची प्रतिक्रिया ही एक दिवस वापस येते .समजा कुणाला तुम्ही मदत केली कोणतीही अपेक्षा न करता तर काही दिवसांनी तुम्ही अडचणीत असताना कुणीतरी तुमच्यासाठी धावून येणारच .समजा तुम्ही कुणाला शिव्या दिल्या तर काही दिवसांनी कुणीतरी तुम्हांला देणारच .बर्‍याच गोष्टी असतात की आपल्याला कुणिच बघत नाही पण त्याची क्रिया वातावरणात आपल्या लहरी सोडते व त्याच लहरी आपटून आपल्या कडे परत येतात मोठी माणसे पैशाच्या जोरावर अनेक वाईट कर्म करतात पण तेच कर्म काही वर्षानी त्यांच्याकडे परत येते म्हणून अंधारात किंवा उजेडात केलेली प्रत्येक कर्म हे वापस आपल्याकडे येत असते त्यासाठी तो कुणी का असेना गरीब श्रीमंत हा भेदभाव नसतो कधी.म्हणून आपणच आपले जीवन घडवत असतो आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो .कर्म करत असताना फार काळजीपूर्वक केले पाहिजे .रामानेही वालिचा वध केला तेव्हा त्या कर्माचे फळ त्याला कृष्ण जन्मात भोगावे लागले.तेव्हा त्यांनाही हा नियम लागू होतो मग आपल्या सारख्यांचे काय? कर्माची गती ही कुणालाच चुकलेली नाही .काही वेळा अजानतेपणे कर्म होते त्याचेही परतावना मिळतो.एखादी बी जाणून बुजून जमिनीत टाकली किंवा अशीच फेकली  तरी योग्य वातावरण लाभले की दोन्ही ठिकाणी झाड हे येणारचं तसेच आपण जाणून बुजून कर्म केले किंवा अजानतेपणे केले तर ते परत येणारच.म्हणून जीवन जगतांना सावध राहिलेले फार चांगले .आपले जीवन सुखी किंवा दुखी हे आपल्यावरचं अवलंबून आहे .बघा पटते काय? आणि सावध व्हायला जमतं का बघा
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...