शिकलेले व न शिकलेले सर्व अडाणी
माणसाने खूप प्रगती केली असे म्हणतात सायकल पासून विमानापर्यंत अनेक शोध लावले.अनेक क्षेत्रांत प्रगती केली पण महत्वाच्या ठिकाणी माणूस अडाणीच राहिला व ते ज्ञान कधीही प्राप्त करु शकणार नाही ते क्षेत्र म्हणजे त्याची exit कधी केव्हा व कुठे होणार हे कुणालाच सांगता येणार नाही आता हेच बघा ना श्रीदेवी कुटूंबा बरोबर दुबईला लग्नाला जाते .नटूनथटून परीसारखी दिसत होती व किती आनंदात असेल व आज त्याच नटलेल्या शरीराची राख होणार एवढे भयंकर वास्तव आहे जीवनाचे व हे वास्तव कुणाचे कधी समोर येईल याबद्दल माणूस अनभिज्ञ असतो .याचे त्याला ज्ञानच नाही की आपला मृत्यू कधी व कशाने होणार ?. लग्न उद्या आहे म्हणून सर्व कुटूंब आनंदात असते व आदल्या दिवशीच अपघाताने नवर देवाचा मृत्यू होतो व सर्वांवर शोककळा पसरते .काहीजण गरीबीवर मात करून शिक्षण घेतात नोकरी लागते थाटामाटात लग्न होते व काही दिवसांनी हार्ट फेल झाल्याने त्याचा मृत्यू होतो याला काय म्हणावे .
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मैदानात सेंचूरी मारतो पण वडिलांना भेटण्यापूर्विच वडिलांचा मृत्यू होतो शिवाजी महाराज गेले तेव्हा संभाजी त्यावेळी त्यांच्याजवळ नव्हते.सचिनचे वडिल गेले तेव्हा सचिनही त्यावेळी त्यांच्याबरोबर नव्हते .श्रीदेवी गेल्यावर त्यांची लाडकी मोठी मुलगी त्यांच्याबरोबर नव्हती बर्याच वेळा आपल्या आवडत्या व्यक्तिचा मृत्यू होतो तेव्हा आपण त्यांच्याबरोबर नसतो .किती हे निष्ठूर वागणे नियतीचे असते .जन्माला आल्यावर असे म्हणतात की मरणाची वेळ व तारीखही बरोबर घेऊन येतो पण त्या वेळेचा व दिवसाचा माणूस शोध लावू शकला नाही.याचा अर्थ घराबाहेर पडल्यावर आपण घरी परत येऊ याची कोणतीच शाश्वती नाही मग जवळच्या व आवडत्या व्यक्ती जेव्हा अचानक जातात तेव्हा मात्र मनात कालवाकालव होते व जीवन जगण्याची प्रेरणा निघून जाते त्यातून सावरायला बराच काळ जातो मग काही दिवसांनी जीवन रूळावर येते असे वाटत असताना परत काहीसा धक्का बसतो व परत जीवन disturb होते असे जीवनात चालूच असते .नियतीचे नियम कुणालाच परफेक्ट माहित नाही .असे म्हणतात की ती कुणाला जन्म देत नाही की मृत्यू. माणूस आपल्या कर्माने जन्माला येतो व आपल्याच कर्माच्या हिशोबाने मरतो मग काही कर्म मागच्या जन्माचे असतात असे म्हणतात. काही मागचा जन्म मानत नाही काही मानतात पण नक्की काय सत्य आहे हे कुणालाच छातीठोकपणे सांगता येत नाही म्हणून म्हणतो माणूस या बाबतीत अजून तरी अडाणीच राहिला बघू या हे ज्ञान कधी गवसते त्याला .
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment