अनोखे लग्न
लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन
पण काही लग्नामुळे होते बरबाद जीवन
लग्न म्हणजे दोन घराण्यांचे जवळ येणे
पण काही लग्न म्हणजे दुश्मनी निभावणे
लग्न म्हणजे सुरक्षितेचे कवच असते
काही लग्नांमुळे मनात अशांतता पसरते
लग्न म्हणजे मिळतो हक्काचा जोडीदार
तोच ठरतो बरबादीचा हक्कदार
लग्न म्हणजे पैशांची देवाणघेवाण
कमी पडले तर चालते जीवनभर पुराण
लग्न म्हणजे भांड्याचा खजिना
विसरतात माणसातला माणूसपणा
लग्न म्हणजे मिळतो भांडण करण्याचा साथी
काहीजण मारून घेतात आपलाच हात माथी
लग्न म्हणजे असतो फक्त व्यवहार
नाही पटले तर तुटतो कायमचा परिवार
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment