Skip to main content

सत्य कथन

एक सत्य कथन

मला आठवते की मी सातवीत असताना एका  गोष्टीची सल मनाला अजून बोचते आहे म्हणजेच चुकीचे मार्गदर्शन जर घेतले तर त्याचे परिणाम आयूष्यभर भोगावे लागतात .मी सातवीत असताना माझ्या वाचनात एक गोष्ट आली होती ती म्हणजे बाहूबलीची .बाहूबली कसा शक्तीशाली होता व त्याने ती शक्ती कशी स्वत: कमावली व तिच्या जोरावर पूर्ण एस टी बस किती तरी किलोमीटर ओढत न्यायचा तेव्हा त्या गोष्टीचा माझ्या कोवळ्या वयावर फार परिणाम झाला व आपण ही त्या बाहूबलीसारखी शक्ती कमवायची  असे ठरवले मग घरच्या लोकांना मी हे काय सांगितले नाही मग पळणे व्यायाम करणे तसे खाणे हे मी सूरू केले .आठ दिवस झाले असतील असे करायला .मग आमच्या गावात किर्तनाचा कार्यक्रम होता तसे मला किर्तन ऐकायला फार आवडायचे व अजूनही फार आवडते .त्या किर्तनात बाबांनी  शरीर व आत्मा याचे कथन केले .शरीराची राख होणार असते व आत्मा अमर असतो म्हणून शरीराचे चोचले जास्त पुरवायचे नाही व त्याच्याकडे जास्तलक्ष देण्याची गरज नसते कितीही कमवले शरीर तर त्याची राखचं होणार असते शेवटी .असे बाबांनी आपल्या किर्तनात सांगितल्यावर त्याचाही माझ्या बालमनावर परिणाम झाला मग विचार केला जर राखचं होणार असेल तर मग कशाला बाहूबली सारखे शरीर कमवून उगीच वेळ वाया घालवायचा .त्यानंतर मी शरीर कमवणे हा विचाच सोडून दिला व माझे शरीर बाहूबली सारखे कमवणे हे क्षणात विसरून गेलो
        आज मला थोडे वाईट वाटते की जर बाबांनी सांगितले असते की शरीर मजबूत असल्या शिवाय तुम्ही काही करू शकत नाही .शरीर बलदंड असेल तर रोगांचा शिरकाव शरीरात होणार नाही .निस्तेज बलहीन माणसाला मदत करता येईल .शरीर चांगले असेल तर त्या परमेश्वराचा साक्षात्कार होईल .भजनाचा कंटाळा येणार नाही .अभ्यासाचा कंटाळा येणार नाही  .आत्माच्या आधी शरीराकडे लक्ष द्या असे स्वामी विवेकानंदानी म्हटले आहे तसेच  संत रामदासांनी ही सांगितले आहे पण ह्या गोष्टी वाचण्यातच आल्या नाहीत म्हणून त्या दिवशीचे चुकीचे मार्गदर्शन मिळाले नसते तर कदाचित बाहूबली नाही तर त्याच्या तोडीचे बनलो असतो म्हणून कोवळ्या वयात चुकीचे मार्गदर्शन मिळाले की तो पगडा मनात राहतो व तसे आपण वागतो व पुढे त्याची जाणीव होते हे छोटेसे उदाहरण आहे .मुलांनाही करिअर निवडताना चुकीचे मार्गदर्शन मिळणार नाही  याची खबरदारी घ्यायला हवी.बघा जमतं का
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...