माहीत नाही
शोध बरेच लावले माणसाने
त्यामुळे जीवन सुकर झाले त्याने
पण उद्या स्वत:चे काय होणार माहीत नाही
सूर्यग्रहण चंद्रग्रहणाच्या अचूक वेळेचा शोध लावला
हवामानाचा अंदाज त्याने बांधला
पण उद्या स्वत:चे काय होणार माहीत नाही
अनेक ग्रह गॅलेक्सी शोधून काढले
अवकाश यानातून भ्रमण केले
पण उद्या स्वत:चे कायहोणार माहीत नाही
क्लोनिंगचा ही प्रयोग यशस्वी केला
चंद्रावर पाय ठेवला
पण उद्या स्वत:चे काय होणार माहीत नाही
अनेक अवघड शस्रक्रियेंचे शोध लावले
विविध अवयव बदलून दाखवले
पण उद्या स्वत:चे काय होणार माहीत नाही
विमानाने आकाशात भरारी मारायला शिकला
पाण्यात पोहायला लागला
पण उद्या स्वत:चे काय होणार माहीत नाही
अनेक शहरे गावं वसवली
बस ट्रेन गाडी त्याच्यात धावली
पण उद्या स्वत:चे काय होणार माहीत नाही
सर्व गोष्टी माणसाच्या हातात आहेत
मृत्यू व जन्म नियतीने ठेवले स्वत:च्या हातात
म्हणूनच उद्या स्वत:चे काय होणार माहीत नाही
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment