प्रश्न नियतीला
नियतीने सर्व जीवसृष्टी निर्माण केली .ही पृथ्वी सूंदर दिसण्यासाठी नदी समुद्र डोंगर दर्या झाडे सर्वच विलोभनिय मग माणूस हे बघून स्वत:ला विसरतो .माणसाला निर्माण करून काय साध्य करायचे होते व हा सर्व खटाटोप नियतीने का तरी रचला .कशाला विविध प्राणी निर्माण केले .केलेत निर्माण पण मग क्रूर खेळ का खेळते नियती .महापूर भूकंप भयंकर उकाडा भयंकर थंडी अनेक प्रकारची रोगराई काडे डास हिंस्र प्राणी कशाला निर्माण केलेत.पदोपदी संकटे निर्माण केलीत का व कशासाठी .एवढ्या संकटातून माणूस मार्ग काढतो मग अचानक मध्येच ऐन उमेदीत बोलवून घेतो असे अनेक लोक आहेत त्यांना जगण्याचा कंटाळा आला व समाजालाही त्यांची गरज उरली नाही तर त्यांना मरणच येत नाही .ज्यांची समाजाला राष्र्टाला अत्यंत गरज आहे त्यांनाच काहीतरी निमित्त करून उचलून नेतो .का? अनेक संत पन्नाशीही ओलांडले नाहीत त्यांना नेले.शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना ऐन उमेदीत काहीतरी निमित्त करून नेले अनेक चांगले राजकारणी उद्योगपती यांना ऐन उमेदीत नेले का.अनेक अभिनेत्री व अभिनेता यांनाही ऐन उमेदीत नेले .जर कुणी एखाद्याचा खून केला तर साक्षिदार कोर्ट कचेर्या जेल वकील हे सर्व मागे लागते व त्याचेही जीवन बरबाद करतात .येथे तर तू अनेक सूंदर कर्तबगार लोकांना नेतोस .त्यांचा काहीही गुन्हा नसताना आणि तुला कुणीही जाब विचारू शकत नाही .उलट तुलाच प्रार्थना करतात आत्म्याला शांती दे.तुझ्याविरूध्द कुणीच बंड पुकारत नाही कारण तू सर्व शक्तिमान आहेस आणि त्याचाच गैरफायदा घेतो आहेस .अरे काहीतरी विचार कर ज्यांना नेतोस त्यांच्या मागील परिवाराचे काय होत असेल .ते कुणाच्या आधारावर जीवन जगतील .असं गप्प राहून असे भयानक कृत्य करू नकोस .तूचं तर गीतेत म्हटले आहे ना की माझ्या परवानगी शिवाय झाडाचे पान ही हालत नाही.सूंदर असणारा संसार का मोडतोस .तुझ्या जागेवर तुझ्या इतका शक्तीमान कुणी नाही म्हणून.जनतेने तर विश्वास कुणावर ठेवावा ?योगा केलेल्यांनाही हार्टअॅटक .न करणार्यांनाही येतो .जे दारू पितात तंबाखू खातात त्यांना कोणताच रोग नाही व ज्यांना कोणतेच व्यसन नाही त्यांना कॅन्सर सारखे आजार .असे का?गुंड चोर दरोडेखोर सुखात जीवन जगतात व सज्जन लोकांना पदोपदी संकटे आडवे येतात .हे असे का? कोणत्या नियमाने करतोस .मग असेच नेतो त्यापेक्षा जन्माला घातले तरी कशाला? गंमत वाटते तुला.बघ मी जे म्हणतो त्याचा विचार कर व असे न करायला जमतं का बघ
प्रा दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment