धावपळ
करतात सर्वजण सकाळपासून
नुसतीच सारखी धावपळ
प्रत्येकाच्या मनात चालते
विचारांची सतत वळवळ
का धावतो हे कळत नसूनही
धावत सुटतात रस्त्याने
मुक्काम मात्र सापडत नाही
मन भरते तेवढे टेंशनने
बस ट्रेन दिसली की
सुटतात तिच्यात चढायला
ट्रॅफिक जाम असेल तर
संताप मात्र सुरवात करतो घुसायला
जन्मापासून मरेपर्यंत माणसाला
क्षणाचीही मिळत नाही फुरसद
अडकून घेतो स्वत:च संसारात
शोधत असतो फक्त आनंद
धावपळ करता करता एकदिवस
येतो जीवनाचा शेवटचा
महत्वाचे काम राहते बाकी
मग पश्चाताप येतो धावपळीचा
कितीतरी वर्ष निघून जातात
नुसत्या सतत धावपळीने
निवृत होण्याची वेळ येऊन ठेपते
पण राहूनच जाते जीवन जगणे
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment