घर
असावे घर स्वर्गाहून सुंदर
असावी कायम ओढ मला त्याची
शब्द पडावे अपूरे त्याची महती गाण्यात
मग सर नसावी त्याला कुणाची
शांती नांदावी माझ्या घरी
तिला बघूनी सौख्य यावे मागोनी
त्यांना बघूनी रागाने घ्यावा काढता पाय
मग लक्ष्मी भरावी घरी पाणी
मीठ भाकरी लागते गोड घरी
नाही त्या चवीला हाॅटेलची गोडी
अंग टाकताच येते झोप भारी
मग मिळते सकाळची नेहमीचीच गाडी
नसावी कटकट नको कुणाची अवेहलना
राम जपाचा छंद प्यारा
ऐकूनी शांती सौख्य नाचे मनी
मग मनाचा आनंद औरच न्यारा
घर नसावे फक्त चार भिंती
प्रेम ओसंडून त्यात वाहावे
विश्वास हा नसावा फक्त पाहूणा
त्याने एकमेकांचे मने जिंकावे
घरालाही असते मन अन् आत्मा
ते नसावे कधी निर्जीव
त्यालाही असते भाषा अवगत
ते समजण्यासाठी आपण असावे सजीव
असे सर्व बघून देव ही करतो वस्ती
वैकुंठ सोडून येतो तो धावत
लक्ष्मीला भेटून होतो त्याला आनंद
घरात शांती बघून होतो तो आश्चर्यचकित
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment