सुपरविजन
सुपरविजन असतो नोकरीचा भाग
तो तर प्रत्येकाला करावाच लागतो
कोणाला कोणते मुले मिळणार
याचा काहीच अंदाज नसतो
सुपरविजन म्हणजे एक असतो कडक पहारा
डोळ्यात तेल घालून करावे
हुशार मुलांना हवा असतो कडक पहारा
अभ्यास न करणार्यांना वाटते घरी निघून जावे
सुपरविजन करताना तहानभूक विसरावी
सुपरविजनने हुशार मुलांना न्याय मिळावा
काॅपी करणार्यांवर चांगलेच लक्ष द्यावे
अन् त्यांना आपला धाक वाटावा
चूक न करता आपली ड्यूटी चोख बजवावी
आळस कंटाळा यांना दूर ठेवावे
सुपरविजन शिक्षा न वाटता
हूशार विद्यार्थी निवडण्यासाठी ती एक संधी अहे असे वाटावे
चांगला हेतू ठेवून तीन तास
भुर्रकन उडून जातात
काम करण्याचे समाधान मिळण्यासाठी जीवनातले तीन तास द्यावेत
सूपरविजनच्या वेळेत गप्पा
गोष्टींना नसावा कोणता थारा
त्याने इकडे तिकडे विद्यार्थ्यांना
मिळतो फुकटच्या मार्कांचा आसरा
सुपरविजन म्हणजे एक
शिक्षकांची परीक्षा असते
त्यात पास नक्कीच होऊन दाखवायचे
त्याने मनाला समाधान खूप वाटते
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment