महिला दिन
आज आहे महिला दिवस
देतो तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
असचं कायम आनंदी राहा
अशी करतो मनापासून इच्छा
कारकुनापासून पंतप्रधानापर्यंत
विविध पदे तुम्ही भूषविली
तुमच्या चांगल्या कामाची
जगाला दखल घ्यायला लावली
विविध क्षेत्रांमध्ये तुमच्यामुळे
झाली चांगली प्रगती
असे कोणतेही क्षेत्र नाही
जेथे नाही तुमची उपस्थिती
चित्रपट खेळातही तुम्ही
दाखवला तुमचा पराक्रम
नासात झालात भरती
अन् अंतराळातही केला विक्रम
काम यशस्वी करण्यासाठी
तुम्ही शिकवली शिस्त
आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर
प्रगती केली मस्त
नोकरी करुन घरदारही
सांभाळतात तुम्ही छान
दोन्ही ठिकाणी जपतात
आपला स्वाभिमान
आॅफिस आणि घरातही
तुमच्याविना पान नाही हालत
कोणतेही संकट आले तरी
मार्ग हळूच त्याच्यातून काढतात
शिवबाला घडवून जिजाऊने
दिला मंत्र स्वराज्याचा
सावित्रीबाईंनी झेलल्या विटा माती
दिला वसा स्वाभिमानाचा
घेतात आदराने लोक नाव
इंदिराजी अन् सावित्रीबाई
शिक्षणासाठी भरपूर कार्य केले
नाव आहे त्यांचे रमाबाई
स्री जोपर्यंत असते शांत
तेव्हा ती लक्ष्मी शोभते
एकदा का झाली दुर्गा
मग काही खरे नसते
जरी कुटूंबावर संकट आले
तरी कुटूंबाला सावरतात
भक्कमपणे मुलांसोबत राहून
त्यांची नौका पार करतात
पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून
केले सिध्द स्वत:ला
घरातही जपले मोठेपण
अन् नंदनवन केले घराला
तुमच्या हिंमतीला करतो
मी मनापासून सलाम
तमाम स्री जातीला कविता अर्पूण
करतो मी आता पूर्णविराम
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
7738601925
Comments
Post a Comment