🌹 पैसा 🌹
पैसा आहे जीवन जगण्याचे साधन
त्याशिवाय कामात लागत नाही मन
पैसा आहे सुखाकडे नेणारा मार्ग
पैसा म्हणजेच सुख असे आहे मानणारा वर्ग
पैशाने वस्तू घेता येतात विकत
पण पैशाने सुख नाही येत घरात
पैसे पैसे करून लोक झाले वेडे
डाॅक्टरांनी बंदी केली खायला पेढे
पैसे कमवून प्यायचा होता चहा गोड
डायबिटिसमुळे फिरवावे लागले चहापासून तोंड
पैशांमुळे वजन वाढलेत श्रीमंताचे
तेच पैसे कामी येतात वजन कमी करायचे
पैशांमुळे झोप उडते माणसांची
कुठे ठेवायचा ही चिंता सतावते त्याची
पैसा असावा फक्त गरजेपुरता
पैशांमुळे सुचतो माणसाला वाकडा रस्ता
जीवनात पै पै जोडावा
गरज आली की तो मोडावा
पैसा म्हणजे असते घरची लक्ष्मी
तिचा सन्मान करावा तुम्ही आम्ही
अतिलोभामुळे काही आहेत जेलमध्ये
कारण वाम मार्गाने पैसा कमवला जीवनामध्ये
पैशांमुळे नात्यात येते दरी
त्याने जोडले जावीत मित्र नातेवाईक दारी
पैशामुळे उतू नये मातू नये
दया क्षमा शांती सोडू नये
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment