तीन पिढ्या
आता तीन पिढ्या म्हणजे आपले आईवडिल आपण व आपले मुले आपले आईवडिलांना उपवास कधी करायचे हे माहीत असतात एकादशी पौर्णिमा अमावस्या कधी असतात हे ही माहीत असते लवकर उठून झाडलोट करणे सकाळी देवाची पुजा करणे देवळात जाणे हा सकाळचा क्रम असतो त्यांचा दिवसभर काम करायचे लवकर जेवायचे व लवकर झोपायचे असा त्यांचा नित्यक्रम .तिर्थयात्रेला जाणे चारधामला जाणे अतिथीला जेवण दिल्याशिवाय जावू न देणे मुक्या प्राण्यांची सेवा करणे मुलांवर प्रेम करणे त्यांना योग्य संस्कार देणे स्वत:अशिक्षित राहून मुलांना शिकवणे ह्या गोष्टी पहिली पिढी करत राहिली आता ती पिढी जास्तीत जास्त अजून वीस वर्ष आपल्याबरोबर आहे त्यानंतर त्या सर्व गोष्टी लोप पावतील
आपली दुसरी पिढी .जे आईवडिल करत होते त्यातील बर्याच गोष्टी आपण कमी केल्या तिर्थयात्रेला क्वचित जातो .जास्त उपवास करत नाही अतिथी बघून त्याचे आदरातिथ्य करतो व तेवढा वेळ ही नसतो देवाची पुजा काहीजण करत नाही तर काही कधीतरी वेळ मिळाला की करतात. मुके प्राणी कमी झालेत टीव्ही बघण्यात थोडा वेळ घालवतो .मोबाईल वापरायला शिकलोत
आता तिसरी पिढी देव म्हणजे भाकडकथा आहैत कशाला जायचे देवळात .जास्त अभ्यांस करून काही उपयोग नाही मोबाईलवर टाईमपास करायला आवडते घरातील माणसांची काय बोलायचे त्यापेक्षा मोबाईलवर गेम खेळायचा घरातील जेवण का जेवण असते त्यापेक्षा पिज्जा बर्गर किती बाहेरचे छान असते एक तास अभ्यांस केला तर तीन तास टीव्ही किंवा दोन तास मोबाईल किंवा तीन तास खेळणे अशा अटी घालतांना दिसतात . तिर्थस्थानाला जाणे म्हणजे एकदम बोर वाटते त्यांना भजन करणे देवळात जाणे देवाची पुजा करणे म्हणजे जुने विचार अडाणी विचार वाटतात त्यांना त्यापेक्षा माॅलमध्ये सिनेमा बघणे मोठ्या हाॅटेलमध्ये खाणे म्हणजे एकदम std.जीवन वाटते .कानात वायरी घालून गाणे व त्यावर डान्स करणे म्हणजे माॅडर्न फाटक्या जीन्स पॅन्ट घालणे म्हणजे सुधारलो असे मानणे अतिथीला घरात का घेतले असे विचारणे.
अशा पध्दतीने तीन पिढ्यातील अंतर आहे काहीजण त्याला अपवाद असतीलच .बघा पटते का?
प्रा दगा देवरे
Comments
Post a Comment