"कुत्रा
कुत्रा असतो पाळीव
तर काही असतात भटके
दोघांत गुण असतात सारखेच
भरवसा नाही कधी तोडतील लचके
भटक्यांवर नाही नियंत्रण
कोणत्याही यंत्रणेचे
कुठेही राजरोस असतात भटकत
नाही भय त्यांना माणसांचे
गल्लोगल्ली दिसतात सगळीकडे
कुत्रे नूसतीच भुंकणारी व भटकणारी
जपून राहावे त्यांच्यापासून
कारण असतात काही अंगावर येणारी
कुत्रा असतो तसा ईमानदार
शैपटीवर पाय दिल्याशिवाय चावत नाही
पण पूर्ण विश्वास ठेवून
त्याच्या नादी जास्त लागायचे नाही
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment